Psalms 125

1जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात
ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत.
2यरुशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती
आता आणि सर्वकाळ आहे.
3नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही.
नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील.

4हे परमेश्वरा, जे चांगले आहेत

आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर.
पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात,
परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल
इस्राएलांवर शांती असो.
5

Copyright information for MarULB